कर्जत | कर्जत तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींकरिता २०२५ ते २०३० या कालावधीसाठी थेट सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले. ५५ पैकी २८ ग्रामपंचायती या महिला वर्गासाठी राखीव असून पोशीर आणि अंजप या ग्रामपंचायतींचे प्रश्न नवीन आरक्षणानंतरही कायम आहेत.
खालापूर | खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या आरक्षणासाठी हरकती घेतल्यावर पुन्हा मंगळवारी (१५ जुलै) तहसीलदार अभय चव्हाण यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली. यावेळी ४५ पैकी २२ ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झाले असून, या २२ ग्रामपंचायतींवर महिलाराज असणार आहे.
नागोठणे | मुसळधार पावसामुळे नागोठणे येथील अंबा नदीने मंगळवारी धोकापातळी ओलांडली होती. त्यामुळे पुराचे पाणी एसटी बसस्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मुख्य बाजारपेठेसह सखल भागात शिरल्याने जनजीवन विस्कळित झाले. यावर्षी अंबा नदीला दुसर्यांदा पूर आल्याने नागोठणेकर नागरिक, व्यापारी, छोटे-मोठे दुकानदार यांची चांगलीच दाणादाण उडाली.
पोलादपूर | मुसळधार सुरू झालेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात खेड हद्दीत भुयारी मार्गापासून २०० मीटर अंतरावर दरड कोसळण्याची घटना तीन महिन्यांत तिसर्यांदा घडली आहे. गेल्या मे व जून महिन्यातसुद्धा याच ठिकाणी दरड कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता.
रोहा | रोहा तालुक्यात सोमवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. मंगळवारी (१५ जुलै) सकाळपासून डोंगर भागात ढगफुटीसदृश्य पाऊस पडल्याने रोहा बाजारपेठेसह ग्रामीण भागातील तळाघर, निवी, भुवनेश्वर, चणेरा, खुटल, उडदवणे, मालसई, कोलाड इत्यादी भागाततील लोकवस्तीत पाणी शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. महादेवखार मुख्य रस्त्यावर व भिसे खिंडीत दरड कोसळ्याने नियोजित मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.
महाड | गेल्या २४ तासांपासून रायगड जिल्ह्यासह महाबळेश्वर विभागात मुसळधार पाऊस पडत असल्याने महाड तालुक्यातील काळ आणि सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे पुराचे पाणी महाड शहराच्या सखल भागात शिरले होते. पाणी शिरल्यामुळे शहरातील नागरिक काहीकाळ धास्तावले होते.
अलिबाग | रायगड जिल्ह्यात विशेषतः दक्षिण रायगडला मंगळवारी (१५ जुलै) मुसळधार पावसाने अशरशः झोडपून काढले. दिवसभर कोसळलेल्या या पावसामुळे महाड तालुक्यात सावित्री नदी, रोहा येथील कुंडलिका आणि नागोठणे येथील अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे महाड, रोहा आणि नागोठणे परिसर जलमय झाला होता.
महाड | शासनाने करप्रणालीचा फेरविचार केला नाही, महाराष्ट्रातील सर्व परवानाधारक परमिटरुम आणि बारचालक आपले परवाने शासनजमा करतील आणि ढाबे सुरु करतील, असा इशारा महाड-बिरवाडी, पोलादपूर परमिट रुम, बार असोसिएशनचे अध्यक्ष सुनील आगरवाल यांनी दिला आहे.
पोलादपूर | ओंबळी धनगरवाडीतील महिलेला १०८ ऐवजी १०२ रूग्णवाहिकेतून पोलादपूर ग्रामीण रूग्णालयात आणताना महिलेची रूग्णवाहिकेमध्येच प्रसुती होऊन तिच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे पोलादपूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेची रूग्णांप्रती अनास्था पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.
कर्जत | कर्जत तालुक्यातील हालीवली गावातील स्मशानभूमीत जादूटोणा करताना काही इसम आढळून आले आहेत. हा प्रकार शुक्रवार, दि. ११ जुलै रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. पैशांच्या हव्यासासाठी हा प्रकार सुरु असताना कर्जत पोलिसांनी धाड टाकली आणि त्यावेळी काही तरुणांची धरपकड करण्यात आली.
माणगाव | शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पत्रकार परिषद घेत अॅड. राजीव साबळे व माणगाव नगरपंचायत नगरसेवक यांना पैशांचे आमिष दाखवून खा. सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेत असल्याचे विधान केले होते. हे आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रिया अॅड. राजीव साबळे यांनी दिली आहे.
उरण | उरण तालुक्यातील मैथिली पाटील हिचा अहमदाबाद विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्या काळजाला चिरणार्या घटनेला महिना उलटून गेला आहे. अपघाताच्या दुसर्याच दिवशी मोठ्या थाटात विविध मंत्र्यांकडून व प्रशासनाकडून मदतीच्या घोषणा करण्यात आल्या. मात्र शनिवारी, १२ जुलैला या घटनेला एक महिना उलटूनही त्या मदतीचा एक रुपयाही पोहोचलेला नाही.
21.1k
रेवदंडा /कार्लई | मुरूड तालुक्यातील बारशिव गावाजवळ एका दुचाकीला कार चालकाने जोरदार ठोकर दिली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर कारचालक फरार झाला होता, रेवदंडा पोलिसांनी त्याला रोहा चेक पोस्टजवळ अटक केली.
रेवदंडा | मुरूड तालुक्यातील प्रसिध्द फणसाड धरणामध्ये वर्षासहलीसाठी आलेल्या अंधेरी - मुंबई येथील एका पर्यटकाचा बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई अंधेरी येथून अकरा जणांचा ग्रुप बोर्ली येथे पर्यटनासाठी आला होता. बोर्ली येथून रविवारी (दि. १३ जून) दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण फणसाड धरण येथे पोहचले.
माणगाव | शासनाच्या वतीने कायाकल्प पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वेगळी छाप उमटवत. ‘कायाकल्प’योजनेत भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अशा सुमारे ४४ शासकीय आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९ आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेले आहेत.
माणगाव | स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये उच्चतम कामगिरी करणार्या नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना केंद्र शासनाकडून प्रोत्साहनात्मक निधी दिला जातो. त्या अंतर्गत माणगाव नगरपंचायत हद्दीमध्ये आकांक्षी शौचालय उभारणीच्या कामासाठी रु. ६४ लाख ८ हजार २९९ इतका निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन शिवसेना प्रवक्ते अॅड. राजीव साबळे यांच्या हस्ते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग, मोर्बा रोड नायासमोर माणगाव येथे उत्साही वातावरणात पार पडला.
कोलाड | मुंबई-गोवा महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच आहे. सोमवारी (२३ जून) रात्री खांब हद्दीत उभ्या असलेल्या ट्रेलरला कारने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीनजण गंभीर जखमी जखमी झाले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास खांब हद्दीतील एचपी पेट्रोल पंपासमोर ही दुर्घटना घडली.
श्रीवर्धन | शेतकरी असल्याची पडताळणी करुन तशी सातबार्यावर नोंद करण्यासाठी १५ हजारांच्या लाचेची मागणी करणार्या श्रीवर्धन येथील महसूल सहाय्यकाविरोधात नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून श्रीवर्धन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
दिघी | रायगड एसटी महामंडळाकडून श्रीवर्धन तालुयासाठी रोहा डेपोची गाडी देण्यात आली आहे. मात्र, या नादुरुस्त एसटीमुळे अपघात अपघात होता होता वाचला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेने प्रवाशांची मोठी दुर्घटना टळली आहे. श्रीवर्धन डेपोसाठी रोहा येथून आलेली एमएम १३ सीयू६८९६ या क्रमांकाची एसटी शनिवारी (२८ जून) सकाळी सहा वाजता प्रवाशांना घेऊन मुंबईहून श्रीवर्धनकडे सुटली.
म्हसळा | तालुयातील कुडतुडी गौळवाडी येथील शेतकरी अिेशनी अशोक कासार यांच्या मालकीचा बैल, गाय आणि दुसरे शेतकरी शंकर लक्ष्मण मिरगल यांची गाय अशी तीन गुरे गावाशेजारील जंगलात चरायला गेली असता वीजवाहिनीची तार तुटून पडल्याने दगावली.
म्हसळा | तालुयांत वारळ गावच्या महिला सरपंच यांनी स्थानिक ग्रामस्थाविरुध्द म्हसळा पोलिसांत अब्रु नुकसानीची तक्रार केली आहे. या ग्रामस्थावर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७, ८, ७९, ३५२, ३५६ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेण | महावितरणच्या उच्चदाबाच्या वीज वाहिन्या एका जागेवरुन दुसर्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी कामाचा तांत्रिक परवाना देण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना महावितरणच्या पेण मंडळ कार्यालयातील उपअभियंता संजय प्रदीप जाधव याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
पेण | पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी उच्च न्यायालयाने उठविल्यानंतर पेण तालुक्यातील जोहे, हमरापूर, कळवे विभागातील गणेश मूर्तीकारांनी ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. सदर मिरवणुकीत शेकडोंच्या संख्येने कारखानदार व कुटुंबीय सहभागी झाले होते. हमरापूर-जोहे हा भाग गणेशमूर्तींचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दरवर्षी येथे हजारो गणेशमूर्ती तयार केल्या जातात. या गणेशमूर्तींना राज्यासह देशात तसेच परदेशात देखील मोठी मागणी आहे.
पनवेल | डॉक्टर तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या तसेच तिचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणार्या तरुणाला खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आनंद दादाभाऊ गते असे त्याचे नाव असून, खारघर पोलिसांनी पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओ असलेला त्याचा मोबाईल जप्त केला आहे.
पनवेल | करंजाडेजवळील वडघर ग्रामपंचायत हद्दीतील फणसवाडी येथील आदिवासींच्या घरांवर सिडकोने तोडक कारवाई केली होती. या संदर्भात आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी नुकताच राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांची भेट घेऊन आदिवासींची कैफियत मांडली. या वेळी मंत्रीमहोदयांनी सकारात्मक प्रतिसाद देत सिडको हद्दीत आदिवासींची किती बाधित घरे आहेत याचा सर्वेक्षण करून तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पाली/बेणसे | सुधागड तालुक्यातील सामाजिक, शैक्षणिक, कामगार व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते प्रमोद मोरे यांनी असंख्य समर्थकांसह शिंदे शिवसेनेत प्रवेश केला. आ.महेंद्र दळवी यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी विधानसभा संघटक लहू पाटील व प्रमोद मोरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संतोष कदम, भूषण शेलार, बाबू शिंदे, धीरज शेलार या प्रमुख कार्यकर्त्यांनीही शिंदे शिवसेनेत प्रवेश केला.
सुधागड-पाली | पाली नगरपंचायतीकडून काही दिवसांपूर्वी शहरातील रस्त्यांवर खड्डे भरण्याचे काम करण्यात आले होते. मात्र काही काळाच्या विश्रांतीनंतर हेच खड्डे पुन्हा शहराच्या रस्त्यांवर उघडपणे दिसू लागले आहेत, ज्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांचा संताप वाढला आहे.
खोपोली | मुंबई-पुणे जुन्या महामार्गावर बोरघाटात अंडा पॉईंडजवळ चालत्या ट्रकमधून लोखंडी पाईप पाठीमागून येणार्या कार आणि दुचाकीवर पडल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर एका लहान मुलासह तीनजण गंभीर जखमी झाले आहेत.
उरण | मनसेच्या दणक्यानंतर उरण तालुक्यातील जेएनपीटी पोर्टमधील न्हावा शेवा फ्री पोर्ट टर्मिनल (एनएसएफटी) जे.एम.बक्षी अँड सीएमए टर्मिनल्स पोर्टने नमते घेत, इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध केलेली नोकरभरतीची जाहिरात रद्द केली आहे. यापुढे स्थानिक वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करुन नोकरभरती प्रक्रियेत मराठी तरुणांना प्राधान्य देण्यात येईल, असे आश्वासन जेएनपीए बंदराचे चेअरमन उन्मेष वाघ यांनी दिले आहे.
पोलादपूर | जुन्या मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात जुन्या महामार्गावर भोगाव हद्दीत रस्त्यावर भेगा पडल्याची बातमी एप्रिल महिन्याअखेरीस ‘रायगड टाइम्स’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर आता स्थानिक ग्रामस्थवर्ग रूंदावणार्या भेगांमुळे खडबडून जागा झाला आहे. पावसाळ्यात दरड कोसळून मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी स्थानिक नागरिकांनी हा प्रकार गांभीर्याने विचारात घेत तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या लक्षात आणून दिला.
तळा | तळा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे जे अधिकारी मुख्यालयी राहत नाहीत, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांची गोपनीय चौकशी करण्याची मागणी शिवसेनचे शहरप्रमुख राकेश वडके यांनी केली आहे. शासनाच्या आदेशान्वये शासकीय तसेच निमशासकीय अधिकारी व कर्मचार्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश असतांना तळा तालुक्यातील महावितरणचे अधिकारी हे मुख्यालयी राहत नाही.
तळा | तळा-मांदाड रस्त्यावर एका भरधाव डंपरने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात चारजणांचा मृत्यू झाला असून २५ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका ७ वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. ही धडक इतकी भीषण होती की एसटीचा मागचा भाग अक्षरशः चिरला गेला. याप्रकरणी कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड अर्थात सीबीएससीने दहावी बोर्डाची परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय २०२६ पासून लागू होईल. याचाच अर्थ पुढच्या वर्षी सीबीएसई बोर्डाकडून दहावी बोर्डाच्या दोन वेळा परीक्षा आयोजित करण्यात येतील. याबाबत गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर सीबीएसईने दहावी बोर्डाची दोन वेळा परीक्षा घेण्याच्या मॉडेलला मंजुरी दिली आहे.
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आता एक महिना पूर्ण होऊन गेला आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण देशात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
पुणे | भविष्यात एसटीच्या प्रवाशांना सुरक्षित प्रवासा बरोबरच वक्तशीर बस सेवा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असलेल्या एसटीच्या स्मार्ट बसेस घेण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. नुकतंच एसटी प्रशासनाने नव्या ३ हजार बसची खरेदी केली.
उमाजी म. केळुसकर| रायगड जिल्हा, महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवरील एक निसर्गरम्य आणि ऐतिहासिक भूभाग. पण या सौंदर्याला एक दुसरी, काळिमा फासणारी बाजूही आहे ती म्हणजे दरड कोसळण्याची सततची भीती. पावसाळा जवळ आला की, रायगड जिल्ह्यातील शेकडो गावांवर टांगती तलवार येते.
उमाजी म. केळुसकर| कोकण रेल्वे! अथांग अरबी समुद्राच्या किनार्याने, घनदाट सह्याद्रीच्या डोंगररांगातून आणि अगम्य खाड्यांमधून वाट काढत धावणारी ही केवळ एक रेल्वे नाही, तर ती महाराष्ट्राच्या विकासाची, कोकणातील समृद्धीची आणि एका स्वप्नपूर्तीची गाथा आहे.
सावंतवाडी | मागच्या वेळी मी त्यांना (दीपक केसरकर) मंत्रीपदाचा कोट दिला होता, आता तो त्यांनी मला दिला. राजकारण हे नशिबावर अवलंबून असते,अशी मिश्किल प्रतिक्रिया रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी दिली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौर्यावर असताना पत्रकारांशी बोलताना त्यांनी हा किस्सा सांगितला.
मुंबई | राज्यातील जमीन क्षेत्रावर सातबारावर आता पोट हिस्सा देखील नोंदविण्यात येणार असून, यासाठी राज्यात १८ तालुक्यांमध्ये पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक महसूल विभागातील तीन तालुके अशा प्रकारे या उपक्रमात निवडण्यात आले आहेत, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत दिली.
मुंबई | पशुपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायास ‘कृषी व्यवसायाचा’ दर्जा देण्यात आला आहे. राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले, पशूपालन व्यवसायास प्रोत्साहन देण्यासाठी हा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे.
मुंबई | सायबर गुन्ह्यात बँकांनी फ्रीज केलेल्या बँक खात्यातून फसवणूक झालेली रक्कम संबंधिताना लवकर मिळण्यासाठी बँकांनी पोलीस प्रमाणपत्रावर बँक खाते खुले करावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले. सायबर गुन्ह्यांबाबत सदस्य सिद्धार्थ शिरोळे यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. या सूचनेच्या चर्चेत सदस्य राहुल कूल, अभिजीत पाटील यांनी उपप्रश्न विचारत सहभाग घेतला.