मजगावमध्ये गोवंशाची कत्तल रोखली; दोनजण अटकेत

By Raigad Times    07-Feb-2026
Total Views |
 mazgoan
 
म्हसळा । तळा तालुक्यातील मजगाव येथे पोलिसांनी गोवंशाची कत्तल करण्याच्या उद्देशाने क्रूरतेने बांधलेल्या एका बैलाची सुटका केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तत्परतेने दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश जातीचा एक बैल खरेदी करून कत्तलीसाठी आणला होता. या बैलाला अत्यंत क्रूरतेने वागणूक देण्यात आली होती.
 
ओरडू नये म्हणून त्याचे तोंड व नाकही दोरीने बांधले गेले होते. या प्रकरणी म्हसळा पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना अटक करण्यात आली आहे. ताजृद्दीन इस्माईल वगनाक (वय 49, रा. मजगाव, ता. तळा) मच्छिंद्र खेलु गावकर (वय 35, रा. रोवळे, ता. तळा) अशी या दोघांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.