अलिबाग | माज अदा करण्यासाठी जात असताना २१ जणांना घेऊन जाणारा पिकअप टेम्पो पलटी झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून २० जण गंभीर जखमी झाले आहेत. अलिबागरोहा मार्गावरील बोरघर येथे हा अपघात झाला. या अपघातामुळे कामगारांमध्ये खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (१३ मार्च) सकाळी गेल कंपनीमध्ये काम करणार्या काही कामगार नमाज अदा करण्यासाठी अलिबाग तालुक्यातील रामराज येथे जात होते. त्यांना घेऊन जाणार्या पिकअप टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बोरघर फाट्यावर टेम्पो पलटी झाला. या अपघातात सर्व कामगार जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केलं. जखमींना अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी खुशमुहम्मद अल्लाउद्दीन (३३) यांचा मृत्यू झाला. कौसर मल्लिक (२४) याची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
इतर जखमी कामगारांमध्ये मोहम्मद रफिक, सोहेब अली, बिट्टूशेट शेख, असीम खान, रोजमहम्मद अली, शाहिद हुसे, तारिफ हूसे, नाहीद हुसेन, मोहम्मद खान, फारूक मलिक, तस्लीम हुसैन, अरमान हुसैन, इब्राहिम अली, एजाज अन्सारी, नुसरत आली, महम्द वकील, अफरोज अन्सारी, महमदशान अहमद, महमद अराफक यांचा समावेश आहे.