उदया बाजारला पालकमंत्री भरत गोगावले यांची सदिच्छा भेट

By Raigad Times    18-Sep-2026
Total Views |
 ALIBAG
 
अलिबाग | ‘उदया महिला उद्योजिका असोसिएशन’च्या माध्यमातून अलिबाग येथे ‘उदया बाजार’ आऊटलेट स्टोअर सुरू करण्यात आले आहे. पालकमंत्री भरत गोगावले यांनी या स्टोअरला सदिच्छा भेट देऊन उपक्रमाचे कौतुक केले.
 
यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक आँचल दलाल, जिल्हा उद्योग केंद्राचे उपायुक्त जी. एस. हरळय्या, जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे, महिला असोसिएशनच्या पल्लवी जोशी, रजनी पाठक, अश्विनी सकपाळ, ईडीआय प्रशिक्षक जॅकी आणि उद्योजक मयूर ठक्कर उपस्थित होते.