कर्जत इंजवली येथे तीन म्हशींचा अचानक मृत्यू, शेतकरी हवालदिल

By Raigad Times    28-May-2026
Total Views |
 karjat
कर्जत | कर्जत तालुक्यातील इंजवली गावातील एका शेतकर्‍याच्या तीन म्हशी अचानक मरण पावल्याने तो हवालदिल झाला आहे. या म्हशींच्या मृत्यूचे कारण समजले नाही. या घटनेमुळे त्या शेतकर्‍याचा दुग्ध व्यवसाय बंद झाला आहे. इंजवली गावातील विष्णू नामदेव फराट यांचा वंश परंपरागत शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय आहे.
 
सकाळी ते म्हशींचे दूध काढण्यासाठी तबेल्यात गेले तेव्हा त्यांना तीन म्हशी मृत झालेल्या निदर्शनास आल्या. हे बघताच त्यांचे हात पाय गळाले. ते वडीलोपार्जित दुग्ध व्यवसाय करीत असल्याने आता काय करायचे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. या दुभत्या म्हशींची किंमत सुमारे पावणेचार हजार रुपये इतकी आहे. या म्हशींचा मृत्यू कसा झाला? याचे कारण समजू शकले नाही.