पनवेल पोलिसांकडून दीड कोटींचा मुद्देमाल मूळ मालकांना केला परत

By Raigad Times    04-Apr-2026
Total Views |
panvel
 
पनवेल | नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या पनवेल विभागांतर्गत येणार्‍या पनवेल शहर, पनवेल तालुका आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गुन्ह्यांत जप्त करण्यात आलेला एकूण १ कोटी ५७ लाख ६४ हजार ५७० रुपये किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला.
 
पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे आयोजित कार्यक्रमात हा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला. चोरीला गेलेली मालमत्ता पुन्हा मिळाल्याने नागरिकांच्या चेहर्‍यावर समाधान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या मुद्देमालामध्ये सुमारे ८९ लाख रुपये किमतीची २३ चारचाकी वाहने, ७ लाख २५ हजार रुपये किमतीचे..