बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रप्रकरणी आणखी एकाला अटक , पनवेल येथील वलप ग्रामपंचायतीच्या नावावर जन्म-मृत्यू दाखला घोटाळा

By Raigad Times    04-Apr-2026
Total Views |
 panvel
 
पनवेल | पनवेल तालुक्यातील वलप ग्रामपंचायतीच्या नावाखाली बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रांची नोंदणी केल्याच्या प्रकरणात पोलिसांनी सोमवारी आणखी एकाला अटक केली. या प्रकरणात यापूर्वी दोन जणांना अटक करण्यात आली असून, एकूण तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
जिल्ह्यात उघड झालेल्या या घोटाळ्यात तब्बल २६६० बनावट जन्म-मृत्यू दाखल्यांची नोंदणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. तसेच यवतमाळ, जळगाव आणि नांदेड आदी ठिकाणीही हजारोंच्या संख्येने अशा बनावट प्रमाणपत्रांची नोंदणी झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. एका दाखल्यासाठी ५ ते १० हजार रुपये घेत आरोपी हे प्रमाणपत्र तयार करत असल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
 
पनवेल तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपींना पुढील तपासासाठी यवतमाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या गुन्ह्यात वलप ग्रामपंचायतीच्या नावाचा गैरवापर कसा करण्यात आला, याचा उलगडा पोलिसांनी केला आहे. तिन्ही आरोपींपैकी दोघांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात एका २२ वर्षीय आरोपीला पोलीस कोठडी देण्यात आली आहे.