दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मिळणार मोफत धान्य ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

श्रीवर्धनच्या शेतकर्‍यांना मिळणार लाभ

By Raigad Times    26-Nov-2026
Total Views |
mumbai
 
मुंबई । दुष्काळग्रस्त भागातील शेतकर्‍यांसाठी मोफत धान्य दिले जाणार आहे. 33 जिल्हयातील 42 लाख 30 हजार 783 शेतकर्‍यांना पुढील तीन महिने पाच किलो मोफत धान्य मिळणार आहे. प्रतिमाणसी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू या प्रमाणात धान्य मिळणार आहे.
 
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील शेतकर्‍यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. बुधवारी (25 नोव्हेंबर) महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा हात देतानाच अजून 13 निर्णय घेण्यात आले आहेत.
 
डिबीटी योजनेत समाविष्ट नसलेल्या 33 जिल्हयातील 42 राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील दारिद्य्र रेषेखालील लाख 30 हजार 783 शेतकर्‍यांना पुढील तीन महिने पाच किलो मोफत धान्य मिळणार. माणशी तीन किलो तांदूळ, दोन किलो गहू या प्रमाणात धान्य मिळणार आहे.
 
रायगडातील श्रीवर्धन तालुक्याचा दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश असल्याने, शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरणार्‍या येथील शेतकर्‍यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत धान्यवाटप केले जाणार आहे. यापूर्वी शासनाने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी पाच हजार रुपयांची रोख मदत जाहीर केली होती. आता मोफत धान्याच्या निर्णयामुळे शेतकरी कुटुंबांना आणखी दिलासा मिळणार आहे.