शासकीय कार्यालयांत नो व्हॉट्सअ‍ॅप वेब ! गोपनीय माहितीच्या देवाणघेवाणीसाठी वापर टाळण्याचे गृह मंत्रालयाचे निर्देश

सायबर घुसखोरीचा धोका

By Raigad Times    25-Nov-2026
Total Views |
new delhi
 
नवी दिल्ली । शासकीय कार्यालयांतील संगणकावर ‘व्हॉट्सअ‍ॅप वेब’चा वापर करताना अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन केंद्रीय गृह मंत्रालयाने केले आहे.
 
व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या लॉगिन सत्राचा गैरवापर करून खात्यांमध्ये अनधिकृत प्रवेश मिळविणे, संदेश वाचणे तसेच वापरकर्त्याच्या नावाने संदेश पाठविण्याचा धोका असल्याचा इशारा भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्राच्या (ख4उ) राष्ट्रीय सायबर गुन्हे धोका विश्लेषण विभागाने दिला आहे.
 
सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअ‍ॅप वेबच्या लॉगिन सत्रावर ताबा मिळवल्यास संबंधित खात्यातील संदेश, संपर्क क्रमांक आणि ग्रुपमधील संभाषणांची माहिती मिळविता येऊ शकते. तसेच संबंधित अधिकारी किंवा कर्मचार्‍याची ओळख धारण करून संदेश पाठविणे, फिशिंगद्वारे गोपनीय माहिती मिळविणे आणि आर्थिक फसवणूक करण्याची शक्यता आहे.
 
शासकीय कागदपत्रे, प्रशासकीय तपशील, आर्थिक व्यवहारांची माहिती आणि गोपनीय पत्रव्यवहार व्हॉट्सअ‍ॅप वेबद्वारे पाठवू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कार्यालयीन संगणकावर लॉगिन कायमस्वरूपी सुरू ठेवू नये. प्रत्येक वापरानंतर लॉगआऊट करावे. सार्वजनिक संगणक, सायबर कॅफे, हॉटेलमधील बिझनेस सेंटर आणि अविश्वसनीय उपकरणांवरून व्हॉट्सअ‍ॅप वेब वापरणे टाळावे.
अनोळखी मेसेज, प्रतिसाद, संशयास्पद हालचाली ही सायबर घुसखोरीची लक्षणे..
आपल्या नकळत खात्यावरून संदेश पाठविले जाणे, संपर्क व्यक्तींकडून अनपेक्षित प्रतिसाद मिळणे किंवा खात्यात संशयास्पद हालचाली दिसणे ही सायबर घुसखोरीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे अशा प्रकारांकडे दुर्लक्ष करू नय. कार्यालयीन संगणकांची ऑपरेटिंग सिस्टिम, इंटरनेट ब्राऊझर आणि सुरक्षा प्रणाली नियमित अद्ययावत ठेवावी. आले आहे.
 
अनोळखी फाईल्स, संशयास्पद डाऊनलोड आणि अविश्वसनीय स्रोतांमधून आलेल्या फाईल्स उघडू नयेत, असेही गृह मंत्रालयाने सूचित केले आहे. शासकीय माहितीची गोपनीयता आणि कार्यालयीन डिजिटल यंत्रणांची सुरक्षितता राखण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी सायबर सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात