श्रीवर्धन | दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या पर्यटकांमुळे श्रीवर्धन तालुका पर्यटकांनी गजबजून गेला आहे. श्रीवर्धन, हरिहरेेशर, आरावी आणि दिवेआगर येथील समुद्रकिनार्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
पर्यटकांच्या अनपेक्षित लोंढ्यामुळे शहरातील हॉटेल, लॉज आणि रिसॉर्ट हाऊसफुल्ल झाले असून, अनेकांना राहण्यासाठी खोल्या मिळवताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.दिवाळीचा पहिला दिवस आणि लक्ष्मीपूजनापर्यंत पर्यटकांची संख्या तुलनेने कमी होती.
मात्र, लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक घराबाहेर पडले. पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि अहिल्यानगर परिसरातील पर्यटकांनी श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्यांना विशेष पसंती दिली आहे. श्रीवर्धन समुद्रकिनार्यावर चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असून, वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेण्यासाठीही पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. पर्यटनस्थळांवरील वाढत्या वर्दळीमुळे संपूर्ण तालुयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे यंदा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दुष्काळाचे सावट आहे.
सध्या काही प्रमाणात पाण्याची उपलब्धता असली तरी आगामी उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे पर्यटनासाठी बाहेर पडणे शय होईल की नाही, अशी चिंता पर्यटकांना सतावत आहे. त्यामुळे उन्हाळ्याऐवजी दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येच कोकण पर्यटनाचा आनंद घेण्याकडे अनेकांचा कल दिसून येत आहे. याचा स्थानिक पर्यटन व्यवसायालाही फायदा होत आहे. दरम्यान, श्रीवर्धन शहराला समृद्ध सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वारसा लाभला आहे.
येथे सण-उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे केले जातात. त्यामुळे पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांनी स्थानिक संस्कृती, परंपरा आणि धार्मिक स्थळांचे संकेत पाळणे आवश्यक आहे. समुद्रकिनार्यांवर तसेच मंदिर परिसरात योग्य आणि सभ्य पोशाख परिधान करण्याबाबत स्थानिकांकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हरिहरेेशर मंदिरात दर्शनासाठी जाताना पूर्ण कपडे परिधान करण्याचे आवाहनही केले जात आहे. पर्यटनाचा आनंद घेताना स्थानिकांच्या भावना आणि धार्मिक परंपरांचा आदर राखण्याची जबाबदारी पर्यटकांनीही स्वीकारावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.