पनवेल । कोर्ट रुममध्ये पक्षकाराने केला आत्महत्येचा प्रयत्न!

31 Jan 2026 19:27:19
Panvel 
 
पनवेल । पनवेल न्यायालयातील एका कोर्टरूममध्ये राजेश परदेशी या व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. न्यायालयीन कामकाजादरम्यान त्याने बाटलीत आणलेले फिनेलसदृश्य द्रव्य प्राशन केल्याचे निदर्शनास आले. प्रकृती बिघडताच त्याला तत्काळ पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 
राजेश परदेशी हे करंजाडे येथे राहणारे असून त्यांचा नातेवाइकांसोबत जमिनीच्या वादातून दिवाणी न्यायालयात दावा सुरू होता. या प्रकरणामुळे ते मानसिक तणावात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी सुनावणीच्या तारखेसाठी न्यायालयात उपस्थित असताना त्यांनी हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, घटनेनंतर न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. संबंधित घटनेबाबत पुढील चौकशी सुरू असून, राजेश परदेशी यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0