इको कारचे नियंत्रण सुटले...अपघातात एकाचा मृत्यू

31 Jan 2026 19:17:43
 Panvel
 
पनवेल । पनवेल रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी (30 जानेवारी) एका अनियंत्रित इको कारमुळे भीषण अपघात झाला. या अपघातात एका पादचार्‍याचा जागीच मृत्यू झाला असून, एका रिक्षाचालकाला दुखापत झाली आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे.
 
प्राथमिक माहितीनुसार, इको कार चालक पनवेल रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असताना अचानक वाहनावरील नियंत्रण सुटले. या कारने प्रथम रस्त्यावरील एका ऑटो- रिक्षाला जोरदार धडक दिली. त्यानंतर पुढे उभ्या असलेल्या वॅगनआर कारलाही धडक दिली.
 
या अपघातानंतर नियंत्रण सुटलेल्या कारने एका पादचार्‍याला धडक दिली, ज्यामध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू झालेल्या पादचार्‍याचे नाव धर्मेंद्र चौधरी असे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अपघातात जखमी झालेल्या रिक्षाचालकावर उपचार सुरू असून, पनवेल शहर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0