पेण । पेण वाशी नाका येथे एका सिलेंडर टेम्पोला अचानक आग आग लागली. टेम्पोत सिलेंडर असल्याने आगीने आणखी भडका घेतला.आग लागल्याचे दिसताच नागरिक भयभीत झाले आणि सैरावैरा पळू लागले.
गुरुवार 22 जानेवारी रोजी पेण शहराकडून भारत गॅस सिलेंडर घेऊन सिद्धार्थ विठोबा ठाकूर हे वडखळ दिशेने जात असताना वाशी नाका येथे त्यांच्या टेम्पोच्या इंजिनला अचानक आग लागली.या आगीत टेम्पो जाळून खाक झाला तसेच भरलेल्या 48 सिलेंडर पैकी 9 सिलेंडरचा ब्लास्ट झाला.
या घटनेची माहिती मिळताच पेण नगरपरिषदेचे अंगणीशामक दलाचे जवान तिथे पोहचले त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. तसेच नागोठणे रिलायन्स इंडस्ट्रीज अग्निशामक आणि जेएसडबलू अग्निशामक तिथे पोहचले.यावेळी घटनास्थळी पेण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संदीप बागुल, वडखळ पोलिस ठाण्याचे निरिक्षक संतोष जाधव स.पो.निरीक्षक विक्रम नवरखेडे, पीएसआय शिल्पा वेंगुर्लेकर आणि वाहतूक शाखा अलिबागचे पीआय भुजबळ व पोलीसांनी घटनेवर तत्काळ नियंत्रण मिळविले.