मुरुड-जंजिरा । काशिद ग्रामपंचायत सरपंच संतोष जयराम राणे यांचे पद अबाधित राहणार आहे. सर्व कागदपत्रांची तपासणी आणि न्यायालयीन निकालांचा अभ्यास केल्यानंतर, कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी रायगड यांचा निर्णय रद्द केला आहे. संतोष राणे यांच्यावर शासनाची जागा विकल्याचा आरोप करण्यात आला होता.
काही महिन्यांपूर्वी रायगड जिल्हाधिकारी यांनी याबाबत निर्णय देताना राणे यांचे पद रद्द केले होते. याविरोधात सरपंच संतोष राणे यांनी कोकण आयुक्त यांच्याकडे दाद मागितली होती. सर्व कागदपत्रांची तपासणी आणि न्यायालयीन निकालांचा अभ्यास केल्यानंतर, कोकण आयुक्तांनी जिल्हाधिकारी रायगड यांचा निर्णय रद्द केला आहे. या निर्णयामुळे संतोष राणे यांना मोठा दिलासा मिळाला असून, ते पुन्हा सरपंचपदावर कार्यरत राहणार आहेत.