दि अण्णासाहेब सावंत अर्बन बँकेच्या महाड येथील प्रशासकीय इमारतीचे उद्या लोकार्पण

21 Jan 2026 20:54:46
mahad  
 
महाड । सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या आणि ग्राहकांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटीव्ह अर्बन बँकेच्या महाडमधील स्वतःच्या मालकीच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण उद्या गुरुवारी, 22 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक, महाड येथे होणार आहे.
 
‘आपली बँक...आपली माणसं’ या ब्रीदवाक्यावर विश्वासाचा पाया रचत गेली 95 वर्षे रायगडच्या सामाजिक व आर्थिक जीवनात योगदान देणार्‍या बँकेसाठी हा सोहळा महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याप्रसंगी खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार असून त्यांच्यासह रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, महाड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील कविस्कर आणि माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांचीही प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
 
दि अण्णासाहेब सावंत को ऑप. अर्बन बँकेच्या महाडमधील या प्रशासकीय इमारतीत पहिल्या मजल्यावर महाड तांबट आळी शाखा दुसर्‍या मजल्यावर मुख्य शाखा, तिसर्‍या मजल्यावर मिटींग हॉल आहे. ही इमारत ही कोकणातील सहकारी बँकांची रोल मॉडेल ठरणार आहे.
 
या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे आयोजन दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटीव्ह अर्बन बँक महाड लिमिटेडच्या संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्यावतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या चेअरमन शोभा सावंत यांनी केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0