अटल सेतूवर वाहनांना टोल सवलत , ई-व्हेईकल्सना पूर्ण टोलमाफी

20 Jan 2026 20:24:59
 new mumbai
 
नवी मुंबई । मुंबई व नवी मुंबईला जोडणार्‍या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटलसेतूच्या वापराकरिता पन्नास टक्के सवलत कायम ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने मान्य केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला.
 
या निर्णयामुळे अटल सेतूमार्गावर प्रवास करणार्‍या नागरिकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या बैठकीत ई-व्हेईकल्स जसे की इलेक्ट्रिक मोटार कार आणि बसेस यांना पूर्ण टोल माफी देण्याबाबतही मान्यता देण्यात आली. इतर वाहनधारकांना 50 टक्के सवलत लागू राहणार आहे.
 
राज्य मंत्रिमंडळाने 4 जानेवारी 2024 रोजी अटल सेतूच्या वापरासाठी पन्नास टक्के सवलत देण्याचा प्रारंभिक निर्णय घेतला होता. त्यानुसार 1 जानेवारी 2026 ते 31 डिसेंबर 2026 पर्यंत पथकर आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच इतर वाहनांसाठी एकेरी प्रवासाचा पथकर दर निश्चित करण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0