महाडजवळ स्विफ्ट चालकाची ठोकर; 8 वर्षीय मुलीचा मृत्यू

12 Jan 2026 13:21:28
 mahad
 
महाड । महाड तालुक्यात एक दुर्दैवी अपघात झाला. रस्त्याच्या कडेने चालणार्‍या भावंडांना एका भरधाव स्विफ्ट गाडी चालकाने जोरदार धडक दिली. यात आठ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे. शनिवारी (10 जानेवारी) दुपारी दीडच्या सुमारास शरण्या अक्षय दवंडे आणि तिचा भाऊ शिवम (वय 9) हे दोघे रस्त्याच्या कडेने चालत होते.
 
यावेळी मुंबई-गोवा महामार्गावरुन भरधाव स्विफ्ट कारने जोरदार धडक दिली. या धडकेत शरण्याचा जागीच मृत्यू झाला. ती इयत्ता दुसरीत शिकत होती. शरण्याच्या अशा दुर्दैवी मृत्यूनंतर गावकर्‍यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. अपघात करणार्‍या कारचालकाचे नाव फरहान अब्दुल कादिर ताजीर (रा. अप्पर तुडील, महाड, रायगड) असे असून, अपघातानंतर तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता.
 
मात्र, आजूबाजूला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. दरम्यान, या अपघाताची बातमी गावभर पसरताच संतप्त ग्रामस्थांनी महाड पोलीस ठाण्यात धाव घेत फरहान ताजीरला त्यांच्याकडे सुपूर्द करण्याची मागणी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0