पेण येथे ५ हजारांची लाच मागितल्याप्रकरणी तलाठ्यावर गुन्हा , दोन खाजगी महिला अटकेत

11 Jan 2026 16:17:07
 pen
 
पेण | पेण तालुक्यात जमिनीच्या सातबारा उतार्‍यावर नाव चढवण्यासाठी तक्रारदाराकडे पाच हजारांची मागणी केल्याप्रकरणी दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. तर कांदळे येथील तलाठी महादेव सिताराम धुमाळ याच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांची कांदळे येथे जमिन आहे.
 
ही जमिन नावे नोंद करण्यासाठी तलाठी महादेव धुमाळ योन पाच हजाराची मागणी केली. याविरोधत तक्रारदाराने रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पडताळणीदरम्यान, संबंधित तलाठ्याने स्वतः तसेच मंडळ अधिकार्‍यासाठी लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याचे अ‍ॅन्टी करप्शनने नमूद केले आहे. पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या पडताळणीत, मोबाईल फोनद्वारे तसेच उपविभागीय अधिकारी, पेण कार्यालयाबाहेर प्रत्यक्ष भेटीत आरोपीने ५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे व ती स्वीकारण्यास मान्यता दिल्याचे पंचनामा व पुराव्यांद्वारे स्पष्ट झाले.
 
त्यामुळे संबधीत अधिकार्‍याविरोधत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक भागवत सोनवणे व सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपअधीक्षक सरिता आय. एस. भोसले (अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, रायगडअलिबाग) आणि पोलीस निरीक्षक निशांत धनवडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, परम ठाकुर, सुमित पाटील तसेच चापो. सागर पाटील यांचा समावेश होता.
 
 
Powered By Sangraha 9.0