नवी मुंबईत १६ लाख १६ हजारांची रोकड जप्त , निवडणूक स्थिर संनिरीक्षण पथकाची कारवाई

11 Jan 2026 17:02:43
 new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक आचारसंहितेचे पालन होण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार नवी मुंबई महानगरपालिकेने शहरात प्रवेशाच्या तसेच मुख्य विविध ९ ठिकाणी दिवसाच्या तिन्ही सत्रांमध्ये २४ तासात २७ स्थिर संनिरीक्षण पथके स्थापन केलेली आहेत. या पथकांमार्फत वाहने व इतर बाबींवर काटेकोर लक्ष ठेवण्यात येत आहे.
 
महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार, आचारसंहिता कक्षाचे मुख्य सनियंत्रण अधिकारी सुनील पवार यांचे मार्गदर्शनाखाली, ९ जानेवारी रोजी, दुपारी साडेबारा वाजण्यादरम्यान एपीएमसी मार्केट जवळील चेक पोस्टवर आचार संहिता कक्षाचे नोडल अधिकारी उपआयुक्त डॉ.अमोल पालवे व परिवहन उपक्रमाचे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारीतुषार दौंडकर तसेच प्रशासकीय अधिकारीसंजीव पवार यांच्या नियंत्रणाखाली एकूण १६ लाख १६ हजार इतक्या किंमतीची रोकड पकडण्यात आली आहे. याबाबत पुढील कार्यवाही सुरू आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0