अलिबाग । राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक हाय सिक्युरीटी नंबर प्लेट बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या वाहनधारकांची वाहने 1 एप्रिल 2019 पूर्वी उत्पादीत झालेली आहेत अशा सर्व वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या https: transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन त्याबाबत नोंदणी करावी, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पनवेल यांनी केले आहे.
इतर अनधिकृत विक्रेत्यांकडुन नंबरप्लेटची नोंद केंद्र सरकारच्या डेटाबेसमध्ये नोंद होणार नाही. याविषयी काही शंका अथवा तक्रारी असल्यास परिवहन विभागाच्या पोर्टलवर अथवा dytccomp.tpt-mh@gov.in या इमेल वर संपर्क साधावा. परिवहन विभागामार्फत सदर हाय सिक्युरीटी नंबरप्लेट बसविण्याकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी. तसेच एका ठिकाणी किमान 25 पेक्षा जास्त वाहन मालकांनी अर्ज केल्यास त्या ठिकाणी ही सेवा देण्यात येईल अस सांगण्यात आले आहे.