कर्जतमध्ये रिक्षाचालकाला परप्रांतीयाकडून मारहाण; मनसे आक्रमक

23 Sep 2025 20:20:18
 karjat
 
कर्जत । कर्जत शहरात स्थानिक रिक्षाचालकाला परप्रांतीय व्यक्तीने कानशिलात लगावल्याच्या प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक भूमिका घेत परप्रांतीय व्यक्तींच्या झोपड्या व अनधिकृत स्टॉल पाडून निषेध नोंदवला.
 
कर्जत शहरातील रिलायन्स पेट्रोल पंप परिसरात परप्रांतीय व्यक्तींनी फळविक्री व कापड विक्रीसाठी झोपड्या उभारल्या होत्या. त्याच ठिकाणी सोमवारी दुपारी रक्षाचालक, याला परप्रांतीय फळविक्रेत्याने कानशीलात लगावली. हा प्रकार शहरात चांगलाच गाजला.
 
या घटनेनंतर मनसेचे जिल्हा विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रसन्न बनसोडे व शहरप्रमुख राजेश साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका शहरातील अनधिकृत टपर्‍या पाडल्या. यावेळी नगरपरिषद प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी उर्वरित अतिक्रमण हटवून संपूर्ण जागा मोकळी केली.
 
 
Powered By Sangraha 9.0