कर्जत | कर्जत तालुक्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोखे भीक मागो आंदोलन करून प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली. गोळा झालेले पैसे सार्वजनिक बांधकाम विभागाला सुपूर्द केले.
शुक्रवारी (१९ सप्टेंबर) सकाळी नेरळ परिसरात साई मंदिर पेशवाई मार्ग येथे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील आणि तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत घोषणाबाजी केली. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोनदा खड्डे भरल्याचे आणि पाऊस थांबताच रस्ते सुस्थितीत केले जातील असेही विभागाने स्पष्ट केले.
परंतु, मनसेने ही फक्त आश्वासने मानत आंदोलन मागे घेण्यास नकार दिला. फक्त कागदोपत्री नाही, तर प्रत्यक्ष रस्त्यांवर बदल हवा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. "जर तातडीने रस्त्यांची दुरुस्ती झाली नाही, तर मनसे आणखी मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरेल आणि प्रशासनाला जबाबदार धरेल”, असा इशारा जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांन दिला.