रोहा ऐनवहाळजवळ ट्रक उलटला; १ ठार ४ जखमी

09 Aug 2025 16:51:45
 roha
 
कोलाड | रोहा तालुक्यातील पुगांव ते ऐनवहाळ या मार्गावर ट्रक उलटून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले. माल खाली करणार्‍या हमालांना ट्रकमध्ये बसवून अपघातग्रस्त ट्रक हा पुगांव ते ऐनवहाळ असा चालला होता. ऐनवहाळ गावाच्या हद्दीत कच्च्या रस्त्यावर टायर गेल्याने ट्रक चिखलाच्या मातीत खचून उलटला.
 
यावेळी जितू उर्फ मोदी प्रेमजीत मखवाना याच्या अंगावर ट्रकमधील रेतीच्या गोणी पडल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. तर संतोष शांताराम कोकाटे, प्रफुल्ल गजानन मगर, ज्ञानेश्वर मोरु साळवी, संजय विठोबा चोरगे हे चौघेजण जखमी झाले आहेत. सदर अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सह पोलीस उपनिरीक्षक कदम अधिक तपास करीत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0