पेण, हमरापूर खाडीभागात बेकायदा खारफुटी तोड; प्रशासनाचे दुर्लक्ष

07 Aug 2025 16:18:35
 uran
 
उरण | पेणच्या हमरापूर खाडीकिनार्‍यावरील खारफुटीची बेसुमार बेकायदा तोड करून, सरळसरळ समुद्र गिळण्याचा डाव सुरू आहे. यावर शासकीय यंत्रणांनी मौन धारण केला आहे. सीआरझेड हा कायदा केवळ पुस्तकात असून समुद्रकिनारी असलेली सरकारी जमीन खासगी भू-माफियांच्या घशात जात आहे.
 
उरण ते धरमतर खाडीकिनारीही खारफुटी झाडांची छाटाछाट करुन, त्यावर भराव करण्यात येत आहेत. त्यावर हॉटेल, ढाबे, फार्महाऊस उभारणी परवानगीशिवाय सुरू आहे. जागृत नागरिकांच्या तक्रारी, वृत्तपत्रांच्या बातम्यांना केराची टोपली दाखवली जाते. स्थानिक प्रशासन, पर्यावरण विभाग आणि जिल्हा प्रशासन डोळे झाकून बसले आहे.
 
हा फक्त निष्काळजीपणा नसून, मूक संगनमताचा प्रकार असल्याची चर्चा नागरीत्रिकांमध्ये सुरु आहे. रायगड जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या प्रकरणात लक्ष घालावे, मेरिटाईम बोर्डच्या आणि पर्यावरण खात्याच्या अधिकार्‍यांची जबाबदारी ठरवून निलंबन करावे, संबंधित भू-माफियांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी होत आहे.
Powered By Sangraha 9.0