कोलाड | गोवे तसेच पुई कॉलनी येथे बस थांबा नसल्याने विद्यार्थ्यांसहित प्रवाशी नागरिक यांचे अतोनात हाल होतांना दिसत असून यामुळे लवकरच गोवे तसेच पुई कॉलनी येथे बस थांबा बांधण्यात यावा अशी मागणी प्रवाशी वर्गातून केली जात आहे. या मार्गांवरून जाणारे विद्यार्थ्यां सहित प्रवाशी नागरिक यांना ऊन, वारा, पावसात तासनतास एसटी बसची वाट पाहत उभे रहावे लागत आहे.
तर या दोन्ही ठिकाणी बस थांबा नसल्याने एसटी बस ही थांबत नाही. यामुळे या विद्यार्थ्यांना व कामगार वर्ग यांना एसटी बससाठी दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील अंतरावर असलेल्या कोलाड बाजारपेठेत पायपीट करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांसहित प्रवासी नागरिक यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून या दोन्ही स्टॉपवर एसटी बस थांबण्यासाठी बस थांबा बांधण्यात यावा, अशी मागणी प्रवासीवर्गातून केली जात आहे.