नेरळमध्ये ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्या

05 Aug 2025 14:22:54
 KARJT
 
कर्जत | नेरळ येथील पाडा भागात असलेल्या राजबाग गृहनिर्माण सोसायटीत राहणार्‍या एका वृद्ध व्यक्तीने जीवनाला कंटाळून राजमाता जिजामाता तलावात उडी मारून आत्महत्या केली. त्यांनी नैराश्यातून आपले जीवन संपवत असल्याची चिठ्ठी खिशात ठेवून आत्महत्या केली आहे.
 
जनार्दन नारायण गायकवाड हे ७५ वर्षांचे होते. सोमवारी (४ ऑगस्ट) दुपारी काही रहिवाशांना पाण्यावर मृतदेह तरंगताना आढळून आला. त्यानंतर नेरळ पोलिसांना कळविण्यात आल्यावर पोलिसांनी ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. पोलिसांनी सदर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविला आणि शवविच्छेदन करून झाल्यावर त्यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात दिले. संबंधित व्यक्तीच्या खिशामध्ये आपण आयुष्याला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे लिहिले होते.
 
 
Powered By Sangraha 9.0