पनवेलमधील डान्स बार तोडफोड प्रकरण , मनसैनिकांना कोर्टाकडून जामीन

05 Aug 2025 17:16:19
 panvel
 
पनवेल | पनवेल येथील नाईड राईड डान्सबारची तोडफोडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन मनसे कार्यकर्त्यांना अटक केली होती. अटकेनंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेकापच्या मेळाव्यातून भाषण करताना पनवेलमधील डान्सबारचा उल्लेख केला होता.
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड जिल्ह्यात पनवेलमध्ये सर्वाधिक डान्सबार असल्याचे त्यांनी म्हटले होते. त्यानंतर, पनवेलमधील मनसे कार्यकर्त्यांनी नाईड राईड डान्सबारची तोडफोड केली होती. याप्रकरणी मनसेच्या २० ते २५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यातील ८ कार्यकर्त्यांना पनवेल तालुका पोलिसांकडून अटक करण्यात आली होती.
 
त्यानंतर, त्यांना पनवेल न्यायालयात हजर केले असता त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि पनवेलमध्ये डान्स बारचे प्रमाण जास्त असल्याने यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास डान्स बार विरोधी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मनसेचे पनवेलमधील शहराध्यक्ष योगेश चिले यांच्याकडून देण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0