मुंबई | राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. राज्यातील पूर परिस्थितीमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबरपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. नदीनाले दुथडी भरुन वाहत आहेत काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं आहे. अवेक ठिकाणी वाहतुकीवरक परिणाम झाला आहे. तसेच वीजपुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे. या स्थितीच्या पार्श्वभूमीवर सहकार विभागाने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.