खोपोली | खंडाळा घाटातील मंकी हिल रेल्वे ट्रॅकवर पेट्रोलिंग करणार्या कामगारांमध्ये झालेल्या शाब्दीक वादातून एकाची हत्या करण्यात आली आहे. रमेशचंद्र वर्मा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून तो उत्तरप्रदेशचा रहिवासी आहे.
या घटनेनंतर मारेकरी फरार झाले आहेत. खोपोलीजवळील मंकी हिल येथे रेल्वे ट्रॅकवर पेट्रोलिंग करणारे कामगार राहत होते. ओल्ड पॉवर हाऊस या इमारतीत दोन कामगार आणि रमेशचंद्र वर्मा यांच्यात शाब्दीक वाद झाले. या वादातून रमेशचंद्रला जबर मारहाण झाली. जखमी रमेशचंद्रला कर्जत रूग्णालयात हलविण्यात आले होते. परंतु त्याचा मृत्यू झाला आहे. याबाबत खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे हे करीत आहेत.