लोणशी-उणेगाव रस्ता पाण्याखाली

20 Aug 2025 18:15:31
 goregoa
 
गोरेगाव | मुसळधार पावसामुळे ढालघर लोणशी उणेगाव गोरेगाव मार्गे जाणारा रस्ता पाण्याखाली गेला आहे. रस्त्याच्या सुरक्षेचा विचार करून वाहतूक बंद करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे.
 
सध्या पावसाचे प्रमाण वाढलेले असून नदी-नाले तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे पुढील काही काळ या मार्गावर धोका कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पर्यायी मार्गांचा वापर करावा, अनावश्यक प्रवास टाळावा, व प्रशासनाने दिलेल्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0