कोर्लई | मुरुड तालुक्यातील मीठेखार येथे घरालगत असलेली संरक्षक भिंत मंगळवारी (१९ ऑगस्ट) सकाळी कोसळली. आवाजाच्या दिशेने पाहण्यासाठी गेलेल्या विठा मोतीराम गायकर (वय ७५) या वृद्ध महिलेच्या अंगावर डोंगराच्या मातीचा मलबा येऊन गाडल्या गेल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
मिठेखार येथे गायकर यांच्या घरालगत संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. रात्रीपासूनच या भागात जोरदार पाऊस पडत आहे. मंगळवारी सकाळच्या वेळेत संरक्षक भिंत कोसळल्याने विठा गायकर ह्या मागील बाजूस पाहण्यासाठी गेल्या असता त्यांच्या अंगावर डोंगराची माती पडून त्यात त्या गाडल्या गेल्या.
या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार आदेश डफळ, मंडळ अधिकारी संजय तवर यांनी घटनास्थळी भेट देऊन आजूबाजूच्या घरांना सावधानतेचा इशारा दिला आहे.