माथेरान घाटात भला मोठा दगड आला रस्त्यावर..

20 Aug 2025 18:27:45
 karjat
 
कर्जत | माथेरान या डोंगरावर वसलेल्या थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या रस्त्यावर भला मोठा दगड कोसळला आहे. या दगडामुळे माथेरान-नेरळ घाटरस्त्यातील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. माथेरानमध्ये मागील २४ तासांत तब्बल २५४ मिली पावसाची नोंद झाली असून सोमवारपासून माथेरानमध्ये पावसाची तुफानी बॅटींग सुरू आहे.
 
पावसामुळे घाटरस्त्यातील वॉटर पाईप स्टेशनच्या खाली असलेल्या पिटकर पॉईंट येथील वळणावर एक भला मोठा दगड रस्त्यावर येऊन थांबला आहे. या दगडाचा आकार प्रचंड मोठा असल्याने वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. हा दगड बाजूला करण्यासाठी जेसीबी मशिनची गरज आहे.
 
मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाची कोणतीही यंत्रणा या ठिकाणी उपलब्ध नसल्याने रस्त्यावर आलेला दगड बाजूला करण्यात अडथळे येत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0