नेरळ मंडलमधील ८१ कार्यकर्त्यांची जंबो कार्यकारिणी , भाजप विविध सेल पदाधिकार्‍यांच्या नावांची घोषणा

02 Aug 2025 18:53:50
 KARJT
 
कर्जत | भारतीय जनता पक्षाच्या नेरळ माथेरान मंडल कार्यकारिणीची निवड मंडल अध्यक्ष नरेश मसणे यांनी जाहीर केली. कर्जत तालुयातील नेरळ मंडलमधील ८१ कार्यकर्त्यांची जंबो कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे नेरळ माथेरान मंडलमधील विविध सेल पदाधिकारी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.
 
नेरळ मंडलमध्ये माणगाव तर्फे वरेडी आणि नेरळ जिल्हा परिषद गट तसेच वाकस पंचायत समिती गण आणि तसेच नेरळ आणि माथेरान शहर या विभागातील पदाधिकारी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे नेरळ माथेरान मंडल अध्यक्ष नरेश मसणे, जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर, महिला मोर्चा कर्जत तालुका नितीन कांदळगावकर, माथेरानचे माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, फ्रेंड्स ऑफ बीजेपी जिल्हा संयोजक नितीन कांदळगावकर, माजी तालुका अध्यक्ष राजेश भगत आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते.
 
यावेळी नवीन कार्यकारिणीमध्ये नेरळ मंडल सरचिटणीस वैभव भगत, नरेश कराळे तर नेरळ मंडल उपाध्यक्ष म्हणून किशोर ठाकरे, हर्षल कुलकर्णी, संभाजी गरुड, रामदास कृष्णा भगत, संतोष धुळे, अनिल जैन यांची नियुक्ती करण्यात आली. नेरळ मंडल चिटणीस पदावर जयेश ठाकरे, राहुल मुकणे, साधना जाधव, मयुरी मसणे, प्रदीप घावरे, शुभांगी बार्‍हे यांची निवड करण्यात आली आहे.
 
भाजप महिला मोर्चा नेरळ मंडल अध्यक्ष म्हणून नम्रता कांदळगावकर, युवा मोर्चा जयेश जोशी, ओबीसी मोर्चा मंडल अध्यक्ष प्रेमनाथ पाटील, अनुसूचित मोर्चा मंडल अध्यक्ष जयदास जाधव, किसान मोर्चा मंडल अध्यक्ष शरद श्रीखंडे आणि अल्पसंख्यांक सेल मंडल अध्यक्ष जावेद जळगावकर या प्रमुखांची निवड जाहीर करण्यात आली. विभागीय पदाधिकारी यांच्यात नेरळ जिल्हा परिषद गट अध्यक्ष म्हणून धनाजी गरुड, माणगाव तर्फे वरेडी गट अध्यक्ष म्हणून रामदास तुपे, नेरळ पंचायत समिती अध्यक्ष संतोष शिंगाडे, शेलू पंचायत समिती दीपक शेकटे, दहिवली गण अध्यक्ष प्रल्हाद राणे, माणगाव तर्फे वरेडी गण अध्यक्ष धनंजय थोरवे, कडाव जिल्हा परिषद गट अध्यक्ष विठ्ठल भागीत, वाकस गण अध्यक्ष गुरुनाथ सोनावळे तसेच माथेरान प्रवीण सकपाळ यांची निवड करण्यात आली.
 
कामगार सेल अध्यक्ष गोरख शेप, उद्योग सेल महेंद्र म्हसकर, व्यापार अध्यक्ष अरविंद कटारिया, भटके विमुक्त आघाडी अध्यक्ष मनेश राजगुरू, इतर भारतीय अध्यक्ष गणेश गिरी, वैद्यकीय सेल अध्यक्ष समीर मनगुळे, दक्षिण भारतीय अरुण नायक, कायदा सेल अध्यक्ष श्रीकृष्ण डुकरे, सहकार सेल अध्यक्ष प्रकाश पेमारे, मच्छीमार सेल कल्पेश राणे, वाहतूक सेल अध्यक्ष प्रवीण पोलकम, सोशल मिडिया अध्यक्ष राजेश नाईक, आयटी सेल मिथिलेश शाह, दिव्यांग सेल वामन विरले, शिक्षक सेल स्मिता खंडागळे, बुद्धिजीवी सेल मिलिंद साने, संस्कृतीक सचिन लोंगले, ज्येष्ठ कार्यकर्ता सेल दिनेश पेटकर, अध्यात्मिक समन्वय विजय पाटील, पदवीधर प्रकोष्ट किरण झोमटे, क्रीडा प्रकोष्ट अमोल चव्हाण, जैन प्रकोष्ट रवी जैन, राजस्थान प्रकोष्ट उत्तम राठोड, बेटी बचाव बेटी पढओ सेल अध्यक्ष शीतल पुजारी, आयुष्यमान सेल अध्यक्ष धनंजय धुळे, पंचायत राज व ग्रामविकास सेल रामदास शेलार आदी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली. यावेळी सर्व पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
 
 
Powered By Sangraha 9.0