अतिवृष्टी, पुरामुळे होणार्‍या नुकसानीचे पंचनामे तातडीने करा-मदत व पुनर्वसन मंत्री

By Raigad Times    19-Aug-2025
Total Views |
 alibag
 
अलिबाग | अतिवृष्टीमुळे निर्माण होणार्‍या पूर परिस्थितीमुळे राज्यात शेतपीक, फळबागांचे नुकसान झाल्यास संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करून त्याचा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले आहेत.
 
मदत व पुनर्वसन मंत्री जाधव-पाटील यांनी सांगितले, नैसर्गिक आपत्तीत नागरिकांचा मृत्यू, झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत मिळावी,जखमी नागरिकांना मदत मिळावी यासाठी शासनाने उणे प्राधिकार पत्रावरून रक्कम आरहित करण्याबाबत यापूर्वीच परवानगी दिली आहे.
 
त्यानुसार संबधित जिल्हाधिकार्‍यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधवपाट ील यांनी दिले आहेत.