अ‍ॅड.सागर पाटील यांचे निधन , अलिबाग येथील सामाजिक कार्यकर्ते

19 Aug 2025 16:45:38
 alibag
 
अलिबाग | राजकीय, सामाजिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे, अलिबाग नगरपालिकेचे माजी नगरसेवक अ‍ॅड. सागर रामकृष्ण पाटील यांचे सोमवारी (१८ ऑगस्ट) रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रामनाथ येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले.
 
अलिबाग येथील कुलाबा नागरी पतसंस्थेचे ते चेअरमन होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर सोमवारी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने अलिबाग परिसरार हळहळ व्यक्त होत आहे. अडीअडचणीमध्ये धावून जाणारा, प्रवाहाविरुद्ध लढणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून सागर पाटील यांची ओळख होती.
 
अलिबाग स्मशानभूमीसाठी त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही. नगरपालिकेत त्यांनी अनेक सामाजिक समस्यांवर आवाज उठवला होता. गेल्या काही वर्षांपासून त्यांची प्रकृती ठिक नव्हती. सोमवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0