बहिरोळे येथे ढोल - ताशांच्या गजरात फोडल्या दहीहंड्या

17 Aug 2025 20:09:00
 Alibag
 
सोगाव | अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथे शनिवार दि. १६ ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने श्रीकृष्ण भक्तांनी व बाळगोपालांनी ढोल - ताशांच्या गजरात व पारंपरिक गीतांच्या ठेक्यावर गल्लोगल्ली जाऊन दहीहंड्या फोडल्या. यावेळी सर्वामध्ये एकच उत्साह वाढला होता.
 
यावेळी प्रत्येक घरोघरी मानवी साखळी धरून पोहोचलेल्या बालगोविंदांवर पाणी ओतून प्रसादाचे वाटप करण्यात आले. यामध्ये लहानांसह महिला व पुरुषांनी अशा सर्वानीच सहभाग घेत आनंद साजरा केला. भरपावसात दहीहंड्या फोडताना गोविंदा किरकोळ जखमी वगळता उत्सव कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता शांततेत पार पडला.
Powered By Sangraha 9.0