खालापूर येथील कलोते धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

13 Aug 2025 20:16:50
 khopoli
 
खोपोली | खालापूर तालुक्यातील कलोते ग्रामपंचायत हद्दीमधील लाईफ अँड जॉय यारिसॉर्टमधील कामगाराचा कलोते धरणात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी (१२ ऑगस्ट) सकाळी ही घटना घडली. अभय शिवाजी राऊत असे या मृत कामगाराचे नाव असून, माजलगाव बीड जिल्ह्यातील आहे.
 
२३ वर्षीय अभय खालापूरमधील लाईफ अँड जॉय या रिसॉर्टमध्ये कामाला लागून चार दिवस झाले होते. हे हॉटेल कलोते धरणाच्या अगदी कडेला असल्याने अभयने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारली. काही अंतर तो पोहला खरा, मात्र अंतर दूरचे असल्याने त्याची दमछाक झाली आणि तो बुडाला.
 
या घटनेची माहिती मिळताच खालापूरपोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेऊन हेल्फ फाऊंडेशन खोपोली यांना पाचारण करून शोध मोहीम सुरु केली असता ४ तासांच्या अथक प्रयत्नांनी अभयचा मृतदेह शोधण्यात यश मिळाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस करीत आहेत.
 
 
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0