उरण | मावळ-पिंपरी, चिंचवड, तळेगाव आणि चाकण हा परिसर देशातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल उत्पादन केंद्रांपैकी एक म्हणून ओळखला जातो. या उद्योजकांना उत्पादनाची निर्यात करताना वाहतूक कोंडीत वेळ जातो.
त्यासाठी न्हावा शेवा बंदरात रोल-ऑन, रोल-ऑफ (रोरो) सुविधा सुरु करण्याची मागणी मावळचे खा. श्रीरंग बारणे यांनी केली आहे. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांची खासदार बारणे यांनी दिल्लीत भेट घेतली. यावेळी यांनी या सेवा सुरु होणे का आवश्यक आहे? याची माहिती त्यांना दिली.