कर्जत | राष्ट्रवादीच्या नेत्यांनंतर कर्जतचे आ. महेंद्र थोरवे आता भाजपवरही टीका करु लागले आहेत. कारण थोरवे यांची पावले उद्धव ठाकरे गटाच्या दिशेने पडत असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांनी केला आहे. इतकेच नव्हे तर ते कधीही धोका देतील, त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडे लक्ष ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.
रायगडच्या कर्जत-खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता सुधाकर घारे यांनी आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर मोठा विस्फोट करत नव्या चर्चे ला उधाण आणले आहे. आमदार थोरवे हे त्यांच्या मतदार संघात आता आपल्याला एकत्र काम करायचे आहे, असा सूर लावत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसोबत लोटांगण घालत आहेत.
शिवाय त्यासाठी मी तुमच्या पायावर डोक ठेवेन, असे ते एका भाषणात म्हणताना दिसत आहेत. यावरून आमदार थोरवे हे ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकरुप होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा आता सुधाकर घारे यांनी केला आहे. जेव्हा महायुती सरकार स्थापन झाले, तेव्हा आमदार थोरवे यांनी अनेकवेळा सुनील तटकरे आणि अजित पवार यांचा एकेरी शब्दांत उल्लेख केला होता. आता ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराज असल्याच्या वल्गना करत आहेत.
"उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे सत्ता असताना राष्ट्रवादीला रायगडमध्ये अदिती तटकरेंच्या रुपात पालकमंत्री पद दिले, तेच काम देवेंद्र फडणवीस आता करत आहेत”, अशी टीका करत "मी याबाबत नाराज आहे”, असे महेंद्र थोरवे यांनी दोन दिवसांपूर्वी म्हटले होते. त्यानंतर सुधाकर घारे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. थोरवे हे याआधी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर टीकाटिपणी करीत होते, त्यांची पातळी आणखीच घसरली असून ते आता भाजवपर देखील टीका करायला लागले आहेत, त्यांची पावले शिवसेना ठाकरे गटाकडे पडू लागली असून एकनाथ शिंदे यांनी थोरवेंवर लक्ष ठेवावे, असेही घारे यांनी दरम्यान, घारे यांच्या या वक्तव्यानंतर रायगडातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, नव्या चर्चेला उधाण आले आहे.
घारे हे पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत-आ.थोरव
मुंबई | सुधाकर घारे हे अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत, त्यामुळे मनाला येईल तसा तो बरळत असल्याची टीका कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. पटलं नाही म्हणून ठाकरेंना सोडण्याचे काम आम्ही शिवसेनेच्या तिन्ही आमदारांनी केले, आमचे सरकार आहे, मुख्यमंत्री आमचे कुटुंबप्रमुख आहेत, आम्ही अधिकारवाणीने काही बोललो म्हणजे आम्ही ठाकरे गटात गेलो असे होत नसते, असेही त्यांनी सुनावले आहे.
राष्ट्रवादीचे कर्जत मतदार संघप्रमुख सुधाकर घारे यांनी आमदार थोरवे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. घारे यांच्या वक्तव्यावर आमदार महेंद्र थोरवे यांनीदेखील बोचरी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, सुधाकर घारे अजूनही पराभवातून बाहेर आलेले नाहीत, त्यांना तटकरे जसे सांगतात, तसे ते बरळत असतात. थोरवेंचे नाव घेतल्याशिवाय त्यांना अन्न गोड लागत नाही आणि दिवसही सरत नाही.
त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याचे म्हटले आहे. सर्वांना माहित आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे तीन आमदार असूनही अदिती तटकरे यांना रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देण्यात आले. त्यामुळेच आम्ही त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उठाव केला, आजही रायगड जिल्ह्यात शिवसेनेला पालकमंत्री पद मिळावे यासाठी संघर्ष आहे,