शिक्षिकेचे अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लिल वर्तन; गुन्हा दाखल

30 Jul 2025 20:36:04
 new mumbai
 
नवी मुंबई | नवी मुंबईत एका शिक्षिकेने तिच्याच शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लिल वर्तन केल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. सदर शिक्षिका इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत असे. याप्रकरणी, संबंधित शिक्षिकेविरुद्ध कोपरखैरणे पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
या शिक्षिकेने तिच्याच शाळेतील एका अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत अश्लिल व्हिडिओ कॉल केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी प्राथमिक तपासणीनंतर पोलिसांकडून कोपरखैरणे येथील ठाण्यात शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
सदर शिक्षिका ही इंस्टाग्रामवर अर्धनग्न अवस्थेत व्हिडीओ कॉल करत होती. याबाबतची माहिती विद्यार्थ्याने त्याच्या पालकांना सांगितल्यावर पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाणे गाठून शिक्षिकेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर शिक्षिकेला अटक केली असताना न्यायालयाने शिक्षिकेला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
 
दरम्यान, मुंबईतून याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक धक्कादायक घटना समोर आली होती. येथील एका नामांकित शाळेतील इंग्रजी शिक्षकाला अल्पवयीन विद्यार्थ्याशी शारीरिक संबंध ठेवल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. ती त्याला दारु पाजायची आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जायची आणि त्याचे शोषण करायची.
 
 
Powered By Sangraha 9.0