वाहतूक पोलिसांचे मोबाईल हिसकावून पळालेले दोघे गजाआड

29 Jul 2025 20:21:28
 panvel
पनवेल | पनवेल वाहतूक शाखेत कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांचे मोबाईल हिसकावून पळालेल्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. पुष्पकनगर समोरील ब्रिजवर जेएनपीटी रोडवर दोन्ही बाजुला अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांवर पोलीस कर्मचारी युवराज येळे व अमीर स्सुल मुलाणी कारवाई करीत होते.
 
यावेळी एका वाहनातून दोन इसम डिझेल काढत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला हटकले असता, या दोघांनी या पोलिसांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचार्‍यांना खाली पाडून त्यांच्या हातातून मोबाईल हिसकावून एका कारमधून हे चोरटे पसार झाले होते. याबाबत पनवेल पोलीसात गुन्हा दाखल झाल्यानंतर शोध सुरु झाला.
 
पोलीस हवालदार परेश म्हात्रे यांना पळून गेलेल्या इसमांची माहिती प्राप्त झाली. यावरुन साहिल लाड (वय २३, रा.कर्जत) व त्याचा सहकारी मुक्शशीर मुसव्वीर टोले (वय २७, रा. घाटकोपर) या दोघांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनी गुन्हा कबुल केला असून मुख्य सूत्रधार जय पंडित याचा शोध सुरु आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0