प्रियकराकडून प्रेयसीच्या पतीची हत्या; मृतदेह वाशी खाडीत फेकला

24 Jul 2025 19:41:36
 new mumbai
 
नवी मुंबई | कॉलेज तरुणासोबत एका विवाहितेचे सूत जुळले, याची कुणकूण नवर्‍याला लागल्यानंतर दोघांमध्ये खटके उडू लागले. अडीच वर्षे हे सुरु होते. शेवटी नवर्‍याने बायकोच्या प्रियकराच्या घरी जाऊन त्याला जाब विचारला. यावेळी दोघांमध्ये जोरदार वाद झाला.
 
या वादातून त्या तरुणाने प्रेयसीच्या नवर्‍याचा डोक्यात फावडा घालून त्याचा खून केला आणि मृतदेह वाशी खाडीत फेकून दिला. पदवीच्या पहिल्या वर्षात शिकणार्‍या २२ वर्षीय मुलाचे प्रेम एका विवाहित महिलेवर जडले होते. गेल्या अडीच वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरु होते. याबाबतची माहिती तिच्या पतीला समजले असता तिला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तरीही पत्नीचे अनैतिक संबंध सुरूच राहिल्याने पती थेट तिच्या प्रियकराच्या घरी गेला.
 
मंगळवारी रात्री पती प्रियकराच्या घरी जाऊन, तुझे माझ्या पत्नीसोबत काय संबंध आहेत सांग, अनेकांनी तुमच्याबद्दल आम्हाला सांगितले आहे. यावरुन त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद इतका टोकाला गेला की, आरोपीने घरातील फावडा डोक्यात घालून त्यानंतर केल्याची खातरजमा करण्यासाठी गळा आवळून खून केला. त्यानंतर आरोपीने मयत व्यक्तीला नवी मुंबईतील वाशी खाडीकिनारी नेऊन फेकले.
 
मृतदेह पोलिसांना मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला आणि विचित्र प्रेम प्रकरणाचा खुलासा झाला. मिळालेल्या माहितीनुसार मुलाने महिलेला लग्नाचीही मागणी घातली होती, यावेळी महिलेने लग्नास नकार दिल्याने तो ही राग आरोपीच्या मनात असल्याने रागाच्या भरात त्याने महिलेच्या पतीला ठार केले. या घटनेचा अधिक माहिती वाशी पोलीस करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0