रेवदंडा येथे बेकायदा वाळू उत्खनन व वाहतूक करणारा अटकेत

22 Jul 2025 18:26:50
 revdanda
 
रेवदंडा | रेवदंड्यात समुद्रकिनारी वाळू उत्खनन करून वाहतूक करणार्‍या ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. २० जुलै रोजी पहाटे सव्वातीन वाजण्याच्या सुमारास एक ट्रक संशयास्पदरित्या चालला असताना रेवदंडा पोलिसांनी त्याला साळाव चेकपोस्ट येथे अडवले. तपासणी केली असता आतमध्ये चोराटी वाळू आढळून आली.
 
याप्रकरणी मूळचा बेळगाव, कणगल येथील मनोजकुमार तानाजी पाटील (वय २९) या चालकाला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत बोर्लीचे तलाठी हेमंत सुधाकर चांदोलकर यांनी रेवदंडा पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार रेवदंडा पोलिसांनी १५ लाख रूपये किमतीचा माल वाहतूक ट्रक, २६ हजार ७४२ रूपये किमतीची सहा ब्रास वाळू जप्त केली आहे.
 
याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश सिताराम बाचकर हे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरविले यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0