भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रविंद्र चव्हाण यांची निवड

02 Jul 2025 20:26:00
 mumbai
 
मुंबई | राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला असून रविंद्र चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा झाली. वरळीमध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये रविंद्र चव्हाणांचे नाव जाहीर करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्यासह प्रमुख भाजप नेते उपस्थित होते.
 
रविंद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जातात. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचे नेते अशीही त्यांची ओळख आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम केले.
 
तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहिलं. चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर ते भाजपचे १२ वे अध्यक्ष म्हणून काम पाहतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त लोकप्रतिनिधी निवडून आणणे आणि भाजपला एक नंबरचा पक्ष बनवणे हे त्यांच्यासमोरील आव्हान असेल.
Powered By Sangraha 9.0