‘छत्री निजामपूर’ ग्रामपंचायतीचे ‘रायगडवाडी’ असे नामांतर

19 Jul 2025 18:01:00
 mahad
 
महाड | महाड तालुक्यातील किल्ले रायगडच्या पायथ्याला असलेल्या ‘छत्री निजामपूर’ ग्रामपंचायतीचे ‘किल्ले रायगड’ असे नामांतर झाले आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी (१८ जुलै) विधानसभेत या नामांतराची घोषणा केली. भाजपचे जत येथील आमदार गोपिचंद पडळकर यांनी काही दिवसांपूर्वी किल्ले रायगडवरील धनगर वस्तीला भेट दिली होती.
 
त्यानंतर माध्यमांशी बोलताता त्यांनी, रायगड पायथ्याला निजामाच्या आठवणी कशाला असा प्रश्न उपस्थित करित ‘छत्री निजामपूर’ ग्रामपंचायतीचे नामांतर ‘किल्ले रायगड ग्रामपंचायत’ असे करण्याची मागणी केली होती. या मागणीचे निवेदन त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही दिले.
 
दौंडचे भाजपा आमदार राहुल कुल यांनीदेखील या नामांतराची मागणी केली होती. याची दखल घेत, छत्री निजामपूर ग्रामपंचायतीचे नामांतर रायगडवाडी ग्रामपंचायत असे करण्यात येत असल्याची घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी शुक्रवारी (१८ जुलै) विधिमंडळात केली.
 
Powered By Sangraha 9.0