जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची प्रारूप प्रभाग रचना जाहीर ; २१ जुलैपर्यंत हरकती नोंदवा

15 Jul 2025 17:35:07
 alibag
 
अलिबाग | जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभाग व प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ही रचना जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडून प्रसिद्ध झाली आहे.
 
या प्रारूप आदेशाच्या प्रती जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, रायगड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर (पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर) या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.
 
या संदर्भात कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास, ती लेखी स्वरूपात, कारणांसह संबंधित तहसीलदार यांच्याकडे २१ जुलै २०२५ पर्यंत सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर प्राप्त होणार्‍या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0