मुरुड फणसाड धरणामध्ये बुडून पर्यटकाचा मृत्यू

14 Jul 2025 19:45:12
 Murud
 
रेवदंडा | मुरूड तालुक्यातील प्रसिध्द फणसाड धरणामध्ये वर्षासहलीसाठी आलेल्या अंधेरी - मुंबई येथील एका पर्यटकाचा बुडून मुत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई अंधेरी येथून अकरा जणांचा ग्रुप बोर्ली येथे पर्यटनासाठी आला होता. बोर्ली येथून रविवारी (दि. १३ जून) दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास हे सर्वजण फणसाड धरण येथे पोहचले.
 
दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास फणसाड धरणात पोहण्यास उतरलेला साहिल राजू रणदिवे (वय २४) हा तरुण धरणाच्या पाण्यात बेपता झाला. याबाबतची माहिती दिपक नारायण पांचाळ रा. मुंबई-अंधेरी यांनी रेवदंडा पोलीस ठाणे येथे दिली. सायकांळच्या सुमारास साहिल याचा मृतदेह धरणातच आढळून आला. अधिक तपास रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपक म्हशीलकर हे करत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0