पनवेल | डॉक्टर तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्या तसेच तिचे अश्लिल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणार्या तरुणाला खारघर पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. आनंद दादाभाऊ गते असे त्याचे नाव असून, खारघर पोलिसांनी पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओ असलेला त्याचा मोबाईल जप्त केला आहे.
आनंद गते हा पुण्यातील भिमाशंकर येथे राहणारा आहे. त्याने गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सोशल मीडियावरून पीडित डॉक्टर तरुणीसोबत मैत्री केली होती. त्यानंतर हे दोघे खारघरमध्ये भेटले असता, त्याने पीडित तरुणीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून तिला सातारा येथील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व त्याचे चित्रण मोबाईलमध्ये केले. या तरुणाला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.