जिल्ह्यात १५ शासकीय आरोग्य संस्थांचा कायाकल्प

10 Jul 2025 18:43:45
 mangoan
 
माणगाव | शासनाच्या वतीने कायाकल्प पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात रायगड जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने वेगळी छाप उमटवत. ‘कायाकल्प’योजनेत भरारी घेतली आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र व २९ आरोग्यवर्धिनी उपकेंद्र अशा सुमारे ४४ शासकीय आरोग्य संस्थांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे. जिल्ह्यातील १५ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९ आरोग्य वर्धिनी उपकेंद्रांना कायाकल्प पुरस्कार जाहीर झालेले आहेत.
 
ही केंद्रे लाखो रुपयांच्या बक्षिसांची मानकरी ठरली आहेत. जिल्हास्तरावरील प्रथम क्रमांकाचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार माणगाव तालुयातील निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाला आहे. या पुरस्काराची माहिती माणगाव तालुयासह रायगड जिल्ह्यात पसरतात अनेकांनी निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीम भारसाखळे यांचे अभिनंदन केले आहे. आरोग्य सेवा सुधारणेच्या दृष्टीने केंद्र शासनाच्या ‘कायाकल्प’ उपक्रमांतर्गत रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
 
सन २०२४-२५ मध्ये रायगड जिल्ह्यातील एकूण १५ प्राथमिक आरोग्य केंद्रांना व २९ उपकेंद्रांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पारितोषिक देऊन गौरविण्यात आले आहे. ही बाब जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचे व जनतेच्या आरोग्यावरीलसकारात्मक परिणामाचे प्रतीक मानली जात आहे. रायगड जिल्ह्यात निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राने सर्वोत्तम कामगिरी बजावत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व दोन लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. या आरोग्य केंद्राच्या व्यवस्थापन, स्वच्छता, रुग्ण सेवा, डॉयुमेंटेशन आणि समाज सहभाग या सर्वच निकषांवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची ही पावती आहे.
 
याशिवाय इतर १४ प्राथमिक आरोग्य केंद्रांना प्रत्येकी ५० हजार रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले असून, यामध्ये विविध तालुयांतील कार्यक्षम केंद्रांचा समावेश आहे. त्यांनी आरोग्य सुविधा, वैद्यकीय सुविधा उपलब्धता, स्वच्छता व रुग्ण संतुष्टि यामध्ये उल्लेखनीय सुधारणा केली आहे. त्याचबरोबर २९ उपकेंद्रांनी देखील कायाकल्प उपक्रमात स्वतःचे स्थान निर्माण केले असून, स्थानिक स्तरावर आरोग्य सेवा पोहचवताना त्यांनी निकोप व स्वच्छ वातावरण निर्माण केले आहे.
 
या उपकेंद्रांची निवड ही त्यांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकता, नियमित तपासण्या, रुग्ण अभिप्राय, तसेच सेवाभावाच्या मूल्यमापनावर आधारित करण्यात आली आहे. ही संपूर्ण कामगिरी रायगड जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या समन्वयाने, वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीने व कर्मचारी वर्गाच्या योगदानाने शय झाली आहे. कायाकल्प उपक्रमात मिळालेले हे यश जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला नवा आत्मविेशास देणारे ठरले आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र निजामपूर आरोग्य संस्थेस प्रथम पारितोषक रक्कम रुपये २ लाख, तर उर्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रांना रक्कम रुपये ५० हजाराचे पारितोषिक मिळालेले आहे. कायाकल्प अंतर्गत २९ उपकेंद्रांना पारितोषिक मिळालेले आहे.
 
यामध्ये माणगाव तालुयातील खरवली उपकेंद्र यांना प्रथम पारितोषिक रक्कम रुपये १ लाख व उपकेंद्र शेळटोली, ता. महाड या आरोग्य संस्थेस रक्कम रुपये ५० हजार, उपकेंद्र सुग्वे, ता. कर्जत या आरोग्य संस्थेस रक्कम रुपये ३५ हजार व उर्वरित उपकेंद्रांना प्रोत्साहन पर रक्कम रुपये २५ हजारचे पारितोषिक मिळाले आहे. याकरिता रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे व कल्याण डोंबिवली शहर कार्यक्रम व्यवस्थापक संदीप राऊत, माणगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दीपाली पुरी, निजामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशीम भारसाखळे तसेच रायगड जिल्ह्यामधील सर्व प्राथमिक आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाले.
 
 
Powered By Sangraha 9.0