खोपोली | खालापूर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कोमल कराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून सोमवारी, ३० जून त्यांनी पदभार स्वीकारला. कराळे या विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभागात सहायक आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. खालापूर नगरपंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी रश्मी चव्हाण रजेवर होत्या.
यावेळी प्रभारी मुख्याधिकारी म्हणून खोपोलीचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याकडे कारभार होता. प्रभारी मुख्याधिकारी असल्यामुळे नगरपंचायतमधील नागरिकांच्या समस्या आणि विकासकामांसाठी अडचण होत होती. त्यामुळे कायमचा मुख्याधिकारी कधी मिळणार? असा सवाल नागरिक विचारत होते. शेवटी कोमल कराळे यांच्या रुपाने पूर्णवेळ मुख्याधिकारी लाभल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.